Description
ते भारतात आले दीडशे वर्षांपूर्वी. चहाच्या मळयात राबायला त्यांना फसवून आणलं होतं. या परक्या जमिनीत त्यांनी स्वत:ला रुजवलं, वाढवलं. या देशालाच आपला अन् इथल्या माणसांना आप्त मानलं. अचानक उठलं एक चक्रीवादळ. त्यांचा मूळचा देश अन् हा आताचा देश यांच्यात सुरू झालेलं युध्द. त्या चक्रीवादळानं त्यांच्या आयुष्याची वाताहत केली. त्यांना मुळापासून उखडून निर्वासित बनवलं. १९६२च्या भारत-चीन युध्दामुळे ससेहोलपट झालेल्या देशोधडीला लागलेल्या भारतातील चिनी वंशाच्या जनसमूहाची करुण कहाणी.