Description
क्रांतीवीर कै.गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे तीन बंधूंपैकी ज्येष्ठ .जन्म दि .१३ जून १८९९ ला भगूर येथे .मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये. पितृनिधनानंतर १८९९ पासून धाकट्या बंधूंचे दायित्व सांभाळले .वास्तविक त्यांची प्रवृत्ती आध्यात्मिक परंतु कर्तव्य म्हणून त्यांनी स्वा. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी उभारलेल्या मित्रमेळा व अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनांमध्ये भाग घेतला. क्रांतिकवि गोविंदरचित "रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? स्वराज्येच्छूने पाहिजे युद्ध केले." इत्यादी चार ,पाच कविता त्यांनी प्रकाशित केल्या .त्यामुळे ब्रिटिश राज्य उलथण्याचा प्रयत्न केला या आरोपाखाली त्यांनी इंग्रजांनी १९०९ साली जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा देऊन १९१० साली अंदमानाला धाडले.मरणासन्न स्थितीत त्यांना १९२१ मध्ये भारतातील कारागृहात आणले. १९२२ मध्ये सुटका केली.यापूर्वीच त्यांच्या पत्नी सौ. येसूताईंचे १९१९ मध्ये निधन झाले.
रुग्णावस्थेतही त्यांनी देशसेवा व्रत सांभाळले .१९२३ मध्ये त्यांनी 'तरूण हिंदू सभेची स्थापना केली.१९३१ ते ३४ इंग्रज शासनाने त्यांना काशीमध्ये स्थानबद्ध केले .तेथे 'राष्ट्र मीमांसा 'हा अतिमहत्त्वाचा ग्रंथ लिहिला. १९३७ पासून ' अखिल भारतीय हिंदु महासभा 'मधून राजकारण केले.दि.१६ मार्च १९४५ ला सांगली येथे त्यांचे देहावसान झाले.