Description
भी वाचलेल्या अत्यंत धैर्यशाली पुस्तकांपैकी एक आपल्या दांभिकपणासमोर, आपल्या नातेसंबंधांसमोर आणि आपल्या स्वार्थी अस्तित्वासमोर ते जणू आरसा धरते. तुम्हाला जर हे पुस्तक वाचण्याची गरज वाटत नसेल, तर तुम्ही वास्तव नाकारत आहात. तुम्ही ते वाचायलाच हवं!
आपल्या आत घुसत हे पुस्तक आपले डोळे खाडकन उघडते आणि आपल्यासमोर आरसा धरते. तुम्हाला जे दिसेल, ते तुम्हाला आवडेलच असे नाही; पण तुमच्या लक्षात येईल की, हेच सत्य आहे।'
अनिर्बन भट्टाचार्य (दूरदर्शन निर्माता, लेखक, स्टैंडअप कॉमेडियन आणि चित्रपट अभिनेता)
'मोठी झालेली मुलं जेव्हा आपल्या म्हाताऱ्या आईबापांना सोडून निघून जातात, तेव्हा काय होते? रितू ललित या चातुर्य, हुशारी, अनुकंपा आणि वास्तवाची सांगड घालून परिस्थितीचा स्वीकार करण्यातली आणि या आजच्या विरोधाभासी जगात जगण्यातली आव्हानं आपल्या समोर आणतात, वाचलंच पाहिजे असं पुस्तक.' डॉ. मैत्री चंद (मॅरेज अॅड फॅमिली थेरपिस्ट, क्लिनिकल असिस्टंट प्रोफेसर मर्सर युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, मेसन, जीए, युएसए)
'हे एक विलक्षण पुस्तक आहे। वयोवृद्ध पालकांची मुलं जेव्हा त्यांच्यापासून दुरावतात, तेव्हा उद्भवणाऱ्या व्यावहारिक आणि भावनिक समस्यांमधून वाट कशी काढावी, याबद्दल ते योग्य सल्ला देते. ते एक आशा देऊ करते.' डायना मॅन्सफील्ड (रेझिंग युवर एजिंग पेरेंट्स' या पुस्तकाच्या लेखिका)