Description
कथा सुखाची... दु:खाची भेटीची... विरहाची वेदनेची... अश्रूची अश्रूमधल्या फुलाची उपकाराची... अपकाराची उद्वेगाची... आकांडतांडवाची मुकेपणाने सोसण्याची भुलण्याची... झुलण्याची मोहधुक्यात हरवण्याची सावध राहण्याची सावज होण्याची आयुष्य उधळण्याची कातडी बचावण्याची उजेडा... अंधाराची उगवतीच्या क्षितिजाची उदास सायंकाळची जगताना मरण्याची मरूनही उरण्याची कथा वपुंची तुमची आमची सगळ्यांची जीवनाचे पुस्तक उघडल्याची