Description
श्रीमंत रघुनाथरावांची तेग, त्यांना घेरणार्या गनिमावर विजेसारखी कोसळत होती. अटकेच्या किल्याचा परिसर तोफांमधून उडलेल्या दारुगोळ्यांच्या वर्षावाने काळवंडून गेला होता आणि त्यातच पांढर्याशुभ्र घोड्यावरील मार्तंड केशरी पेहराव ल्यालेली आणि हाणा... मारा... अशा आरोळ्या देत गनिमावर तुटून पडणारी दादासाहेबांची विकराल पराक्रमी मूर्ती पाहुन अर्धमेला झालेला मराठी वीरदेखील मोठ्या तडफेने गनिमावर चालून जात होता.