Skip to product information
1 of 1

Shaleya Vidyarthyansathi Utkrushta Bhashane | शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट भाषणे By Aruna Kalaskar

Shaleya Vidyarthyansathi Utkrushta Bhashane | शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट भाषणे By Aruna Kalaskar

विद्यार्थी मित्रहो, वक्तृत्व ही एक कला आहे. ती आत्मसात करण्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक असते. समूहापुढे उभं राहायचं कसं? आपण लिहिलेलं भाषण श्रोत्यांसमोर मांडावं कसं? आपण भाषण करताना काही विसरणार तर...

Regular price Rs. 130.00
Sale price Rs. 130.00 Regular price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 130.00
View full details

विद्यार्थी मित्रहो, वक्तृत्व ही एक कला आहे. ती आत्मसात करण्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक असते. समूहापुढे उभं राहायचं कसं? आपण लिहिलेलं भाषण श्रोत्यांसमोर मांडावं कसं? आपण भाषण करताना काही विसरणार तर नाही ना? कारण समोर श्रोते पाहिल्यावर अनेकांची बोबडी वळते, बरं का! वक्तृत्व ही केवळ शब्दांचीच आतषबाजी नसते तर ती जीवनाची उपासना असते. ही उपासना निष्ठापूर्वकच करावी लागते. वक्त्याच्या ठायी शब्दशक्ती, विचारशक्ती, स्मरणशक्ती याचबरोबर एक अवधान शक्ती असली पाहिजे. प्रत्येक वक्त्याला स्वत:ची म्हणून एक शैली असावी लागते. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती व्यक्त होत असते. रियाजाने जसे गाणे जमते तसेच उत्तम वक्तृत्वदेखील साधनेतूनच आकाराला येते.
उत्तम वक्ता होण्याची इच्छा बाळगणार्यांनी प्रथम उत्तम श्रोता झाले पाहिजे, अनेकांना ऐकले पाहिजे. उत्तम वक्ता होण्यापूर्वी उत्तम वाचक झालं पाहिजे. म्हणूनच भाषणकला म्हणजेच वक्तृत्वकला अंगी कशी बाणवावी यासंबंधीचे विवेचन या पुस्तकातून केले आहे. यात मांडलेल्या विषयांचा उपयोग होऊन तुम्हीही आपले स्वतंत्र विचार मांडणारे ‘वक्ते’ निश्चितच व्हाल.