Skip to product information
1 of 2

Sita : Warrior of Mithila (Marathi) - 2 Sita : Mithilechi Yoddah (Ram Chandra Series) By Amish Tripathi

Sita : Warrior of Mithila (Marathi) - 2 Sita : Mithilechi Yoddah (Ram Chandra Series) By Amish Tripathi

आज गरज असलेली योद्धा आहे ती.आपण वाट पाहात असलेली देवी आहे ती.ती धर्माचं संरक्षण करेल. ती आपलंही रक्षण करेल.ख्रिस्तपूर्व ३४०० सालातील भारतविभाजन, असंतोष, गरीबीनं भारत त्रस्त आहे. लोक राज्यकर्त्यांचा तिरस्कार...

Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 350.00
View full details
आज गरज असलेली योद्धा आहे ती.
आपण वाट पाहात असलेली देवी आहे ती.
ती धर्माचं संरक्षण करेल. ती आपलंही रक्षण करेल.
ख्रिस्तपूर्व ३४०० सालातील भारत
विभाजन, असंतोष, गरीबीनं भारत त्रस्त आहे. लोक राज्यकर्त्यांचा तिरस्कार करतात. भ्रष्ट आणि स्वार्थी उच्चभ्रूंचाही ते तिरस्कार करतात. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश. गोंधळ माजण्यात आहे. बाहेरील जग या विभाजनाचा फायदा घेतं. दिवसेंदिवस लंकेचा राजा रावण अधिकाधिक शक्तिशाली होत आहे. दुर्दैवी सप्तसिंधू प्रदेशात तो आपले दात खोल खोल रुतवत आहे.
याच भारतात आहेत दोन शक्तिशाली जमाती. भारताच्या पवित्र भूमीचं रक्षण करणाऱ्या या दोन्ही जमाली ठरवतात – अती झालं आता. आता गरज आहे एका रक्षणकर्त्याची. ते शोध घेऊ लागतात.
माळावर एक बेवारस मुलगी मिळते. खुनशी लांडग्यांच्या टोळीपासून एक गिधाड तिचं रक्षण करतं. शक्तिहीन आणि उपेक्षित मिथिलेचा राजवंश तिला दत्तक घेतो. ही मुलगी मोठेपणी काही वेगळं करेल असं कुणालाच वाटत नाही. पण सगळेच चूक ठरतात. कारण ती कुणी सामान्य मुलगी नाही. ती आहे सीता.
राम चंद्र मालिकेच्या भव्य महायात्रेच्या शृंखलेतील अमीश यांचं नवं पुस्तक : एक रोमांचक साहसकथा. या कथेत भेटा एका दत्तक पुत्रीला, जी पुढे बनते भारताची पंतप्रधान. त्याही नंतर बनते – देवी.
राम चंद्र शृंखलेतील हे दुसरं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला मागे नेतं – अगदी, सुरुवातीच्याही मागे.