Description
विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संध्या देवरुखकर यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. या मुलांच्या परिस्थितीविषयी तसेच मतिमंदत्व म्हणजे काय? एपिलेप्सी म्हणजे काय? हे समजावून सांगणारे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे लेख यामध्ये आहेत. या समस्येची शास्त्रीय माहिती देऊन पालकांच्या मनातील अनेक शंकांचे निराकरण करण्याचा प्रयत्न यातील विविध लेखांमध्ये करण्यात आला आहे.

