Description
“इंग्रज आजचे नाडलेल्यांस झुकतें माप देईल,
की त्यास आजचे राजासरजांस मोडणे आहे.
तो कलागती लावेल, की एका एकजूट शंभरास
सांभळणेपेक्षा शंभर अलगविलगांस राखणें सोपें.
तर तो हरावा कसा? सोपें!
तो हरेल, इथले काळे एकमेकांस धरून
बाहेरच्यांस परास्त करतील, तेव्हा!
परंतु तो हरावा तरी कशासाठी?
जर इंग्रज रुपयांत बारा, चौदा आण्यांस नीट राखेल,
तर बाकी दोचार आण्यांस कोण आईकणार?
तर इंग्रजास पुणें शहर, पेशवाई, मराठशाई,
कोणी नाकारणार नाहीत! बलावून घेतील!’’
मराठेशाहीच्या अंतकाळाची कहाणी सांगत आहे-
‘अंताजीची बखर’चा नायक

