Description
श्रीशिवभारत कवीन्द्र परमानन्द यांनी मूळ संस्कृतमध्ये काव्यात लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सर्वात प्राचीन इतिहास आहे. परमानन्द शिवकालिन होते, असे कागदावरून पक्के होते. सिद्दी जोहाराच्या मृत्यूनंतर आणि महाराजांच्या राज्य सोहळ्यापूर्वी या दरम्यान हा ग्रंथ रचला असावा. त्यात 32 अध्याय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरेख चित्र, त्यांची कुंडली, त्यांचे त्या काळच्या प्रदेशांचे विविध नकाशे यांनी हे पुस्तक अधिकच समृद्ध व अभ्यासपूर्ण झाले आहे. महाराजांविषयी आणि लढायांविषयी अत्यंत तपशिलवार वर्णन यात आहे. प्रत्येक शिवभक्ताने वाचलेच पाहिजे, असे हे श्रीशिवभारत आहे.