Description
१४ फेब्रुवारी २०१५ रोजी, रत्नाकर मतकरी यांच्या साहित्य-कारकिर्दीला
६० वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत, त्यांनी ‘गूढकथा’ हा वैशिष्टयपूर्ण
कथाप्रकार मराठी साहित्यात रुजवला; त्याशिवाय, कादंब-या, ललित
लेखसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, बालकथा, बालगीते, असे नाना प्रकारचे
दर्जेदार आणि वाचकप्रिय लिखाणही केले. मात्र या लेखनप्रपंचासोबतच
त्यांनी मुलांसाठी व प्रौढांसाठी जी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके
(७५च्या आसपास) लिहिली, ते त्यांचे, मराठी साहित्याला आणि
रंगभूमीला, भरभक्कम योगदान म्हणावे लागेल! विविध विषयांवरच्या,
भिन्नभिन्न शैलीतील, विचारसंपन्न आणि रंगतदार, अशा या नाटकांच्या लेखनाबरोबरच मतकरींनी दिग्दर्शन, नेपथ्य-रंगभूषा-वेषभूषा इत्यादींचे
संकल्पन, अभिनय, निर्मिती अशा रंगभूमीच्या सर्वच शाखांमधून संचार
केला. या दीर्घ रंगप्रवासात त्यांनी नाटयक्षेत्रातील समस्यांचा, आणि
त्याहीपेक्षा सखोल अशा, रंगभूमीच्या मूलभूत प्रश्नांचा सातत्याने विचार
केला. त्या संदर्भातील त्यांचे सविस्तर विश्लेषण, हा ‘माझे रंगप्रयोग’चा
गाभा आहे. रंगभूमीच्या वाढीसाठी अपरिहार्यपणे कराव्याशा वाटलेल्या
प्रयोगांचे हे तपशीलवार सत्यकथन, लेखकाच्या ओघवत्या नाटयपूर्ण
शैलीमुळे एखाद्या कादंबरीसारखे वाचनीय झालेले आहे. अनेक छायाचित्रांनी
परिपूर्ण असे हे पुस्तक रंगभूमीच्या अभ्यासकाप्रमाणेच, सर्वसामान्य
रसिकालाही, संग्रही ठेवावे, असेच वाटेल! – इट्स अ कलेक्टर्स आयटेम !