Description
पेशंट आणि डॉक्टरांमाधील वाढणारी दारी वैद्यकीय पेशाच्या -हासाचं दर्शन घडवते. वैद्याकीय पेशातील गल्लाभरू वृत्ती वाढीस लागल्यानं या व्यवसायाची नीतीमूल्य संपुष्टात येत आहेत. डॉ. रवी बापट आणि सुनीती जैन यांनी या बदलावर बोट ठेवले आहे. वैद्यकीय पेशातील या आपप्रवृत्तीवर ते परखड भाष्य करतात. वैद्यकीय सेवा ही शेवटी मानवतेची सेवा आहे, ते पाहताना कुणाही संवेदनशील व्यक्तीला यातना झाल्यावाचून राहणार नाहीत, असे डॉ. बापट लिहितात. हे असं का घडलं, या प्रश्नाचा ते पुस्तकातून वेध घेतात. या व्यवसायाला पूर्वप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपण सर्वानीच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असं आवाहनही ते करतात.

