Description
द ओल्ड मॅन अँड द सी या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा हा अनुवाद आहे. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.