Description
अज्ञान हेच दुःखाचे मुळ कारण आहे,' असे सांगणाऱ्या दादा भागवत यांच्या मुलाखतीचा हा
पहिला खंड आहे. पुस्तकाच्या प्रारंभी त्यांचे संक्षिप्त चरित्र आणि त्यांच्या कार्याची रूपरेषा दिली आहे.
यानंतरचा भाग हा त्यांच्या विचारांची ओळख करून देणारा आहे. उपासना कशासाठी करायची, कर्म,
अतृप्त वासना, मानवतावाद, दु:ख, सुखाची प्राप्ती, परमार्थ, व्रतवैकल्ये, प्रार्थना आदींवर भाष्य केले आहे.
'ज्ञानसाधना हा साधनात्रयीचा सर्वात महत्त्वाचा भाग. कारण तो भाग आत्मसात केल्याशिवाय
ईश्वरीतत्वाची ओळख करून देणारे कुठलेही साधन बुद्धीजीवी जिज्ञासू श्रद्धेन व निष्ठेने स्वीकारणार नाही,'
असे भागवत म्हणत. अशाच काही महत्वाच्या संकल्पनांचा उलगडा या पुस्तकातून होतो..
पुस्तकासोबत - ॐकार साधना - DVD मोफत.वैचारिक बैठक, विभूतींचे मार्गदर्शन, मानवता हाच खरा धर्म,
दु:खामागील कारणमीमांसा इत्यादी अनेक विषयांचे आकलन करून देणारे प्रबोधनात्मक पुस्तक.