Description
आमच्या संसारवेलीवरचे पहिले फूल. पण ते कधीच पूर्ण फुलणार नाही, हे समजले, आणि सुरु झाली तिच्या संगोपनाची बिकट वाट. तीच पुढे झाली वहिवाट, नित्य नवी आव्हाने, रोज नवे खाचखळगे, सततची अनिश्चितता, चिंता आणि आशा-निराशेचे हिंदोळे. या वाटेने अनेकदा दमवले, थकवले, हरवले, पण खूप काही शिकवलेसुध्दा. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार, आणि झुंजण्याचा निर्धार.. माणसे वाचण्याचे कसब, आणि त्यांच्या वागणुकीमागचा विचार. आरोहीच्या जन्मापासून सुरू झालेले हे शिक्षण, आजही सुरूच आहे.