Description
मराठी बालवाङ्मयात अनेक साहित्यिकांनी मुलांसाठी दर्जेदार साहित्याद्वारे संस्कारांचा अनमोल ठेवा रचला आहे.
प्राप्त परिस्थितीतील वास्तवता, त्यातून निर्माण होणारा संघर्ष व अनेक संकटातूनही सकारात्मक दिशेने वाटचाल करणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या कथा म्हणून रवी राजमानेंच्या कथांचा उल्लेख करावा लागेल.
रवी राजमाने हे स्वतः हाडाचे शिक्षक व संवेदनशील साहित्यिक असल्याने त्यांच्या या सर्व सत्यकथा रंजकतेबरोबरच सुसंस्काराचे धडे देणाऱ्या आहेत.
या कथा किशोर, कुमार किंवा तरुणांनाच नाही तर आबालवृद्धांना भावणाऱ्या आहेत.
मानवी जीवनमूल्ये जपणारा ‘बालवीरांच्या साहसी कथा’ हा कथासंग्रह आनंददायी अनुभव ठरेल.

