Description
पेगी मोहन वाचकाला भारतीय भाषांच्या दुनियेतल्या विलक्षण
सफरीवर घेऊन जातात. भाषाविज्ञान आणि इतिहास या दोहोंची
सांगड घालतात आणि गेल्या सहस्रकांमध्ये होत राहिलेल्या स्थलांतरांचा
आपल्या बोलण्यावर आणि आपल्या बोलण्याच्या तऱ्हांवर कसकसा
परिणाम होत गेला आहे, याचा शोध घेतात. ‘भारतीय भाषांची अनोखी
कहाणी` हे पुस्तक समजायला सोपं तर आहेच, पण ते वाचणं आपल्या
सगळ्यांसाठी आवश्यकही आहे.
- टोनी जोसेफ
अत्यंत स्वागतार्ह भर... मानवी समूहांच्या भाषा त्या समूहांइतक्याच गतिशील
असतात... पेगी मोहन हा भारतीय उपखंडात झालेल्या प्राचीन स्थलांतरांचा
वृत्तान्त भाषांच्या बदलत्या रूपाशी जोडून घेतात. शिवाय त्यांची नेमकी भाषिक
निरीक्षणं... त्यातून या पुस्तकाला एखाद्या सुरस गोष्टीचं रूप येतं. तो एक
आनंददायी अनुभव ठरतो.
- माधव देशपांडे
स्थलांतरं, नवीन प्रदेशात केलेल्या वस्त्या, मिश्र विवाह, आणि लोकांच्या
सरमिसळीतून झालेला विविध भाषांचा जन्म या सगळ्याभोवती हे
अतिशय विलक्षण पुस्तक फिरतं... इंडो-आर्यन लोकांच्या वसाहतींच्या
भूलभुलैयामधून हिंडताना पेगी थेट शरलॉक होम्सप्रमाणे सूक्ष्म पुरावे
गोळा करत जाते... भाषावैज्ञानिक इतिहासाबद्दलच्या पुस्तकांमधल्या
सर्वाधिक वाचनीय पुस्तकांपैकी हे एक आहे.
- अन्विता अब्बी