Description
दुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, ‘‘हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, ‘‘कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!'’ त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...