Description
पूर्वी 'किर्लोस्कर' मध्ये सदर रूपाने प्रसिद्ध झालेली लेखमाला आता सुधारित रूपात पुस्तक म्हणून प्रसिद्ध होत आहे, याचा मला आनंद वाटतो. गणितातील गमतीजमती वाचून वाचकाला गणिताबद्दल आपुलकी वाटेल, निदान त्याचे कुतूहल तरी वाढेल अशी आशा आहे. लेखमालेला 'किर्लोस्कर'च्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. पुस्तक रूपाने ती अधिक वाचकांना सुलभ करून दिल्याबद्दल मी श्री. अरविंद पाटकर यांचे आभार मानतो.