Description
सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं' हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी? 'साथ' म्हणजे काय? अन् संगत म्हणजे? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना – असं मानून तबला–तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन