Description
पं. भातखंडे - वझेबुवा - अब्दुल करीमखाँपासून कुमारगंधर्व - भीमसेन - माणिक वर्मांपर्यंत अनेक प्रतिभावान कलाकारांनी समृध्द केलेले हिंदुस्थानी संगीत. या दिग्गज कलावंतांच्या मांदियाळीने आपल्या नितनव्या सादरीकरणातून उभ्या केल्या वेगवेगळया प्रयोगकल्पना. संगीतविश्वातली अतिशय मोठया आवाक्याची, संपन्न, अनन्यसाधारण स्वरूपाची मौखिक आणि प्रयोगसिध्द परंपरा म्हणजे हे हिंदुस्थानी संगीताचे दालन. हे दालन उजळून तेजाळून टाकणा-या दीपस्तंभाप्रमाणे पथप्रदर्शक कामगिरी केलेल्या प्रतिभाशाली कलाकारांच्या संगीतनिर्मितीचा गाभा उकलून दाखवणारे मला भावलेले संगीतकार