Description
देव -दानव, भुतं-खेतं, चमत्कार
यांच्यावर विश्वास ठेवणारी ती भोळी जमात.
माझ्या शब्दांनी आधीच ते गोंधळले असणार.
त्यामागोमाग विजेसारखा लखलखाट आणि मग पाहतात तर मी अगदी त्यांच्यासमोरून एकाएकी गायब झालेलो.
नवल आणि भीती.
त्याबरोबरच त्या जत्तारीचा संशय आणि त्याच्यावर राग.
त्यांच्या मनावर पारंपरिक संस्कारांचा
किती पगडा होता मला माहीत नाही;
पण त्या जत्तारीने माझ्याविरुद्ध काही काही सांगायचा प्रयत्न केला तर ते त्याचं म्हणणं आंधळेपणाने मान्य करतीलच अशी आता खात्री राहिली नव्हती.
माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकांत नारायण धारपांचे स्थान वरचे आहे.
धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.