Description
ब्रेकिंग न्यूज\'च्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग. या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.