Description
आयुष्य जगण्यालायक बनतं ते कशामुळे? आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे, मोलाचे घटक कोणते? प्रत्येक श्वासाची किंमत काय असते? संपूर्ण शांतता हीसुद्धा हजारो शब्दांइतकी बोलकी कशी असू शकते? खऱ्या प्रेमापोटी कोणताही उद्देश नसतो. एकत्र, एकजीव असणं हे मूल्य, देवाणघेवाणीच्या पुष्कळच वर असतं. हे तुझं - हे माझं याच्यापलीकडे आपण आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या नावे लिहिण्याची हद्द सुरू होते. आपल्या माणसाची काळजी करणं, काळजी घेणं हे शब्दातीत असतं. स्वार्थ सोडण्याची सीमा एवढी विस्तारता येते की, एका क्षणी तुमचं असं वेगळं अस्तित्वच शिल्लक उरत नाही... अशा एक ना अनेक सत्यांची जितीजागती अनुभूती येण्याचा तो कालखंड होता!