Description
इसवी सन 2020 पर्यंत किंवा जमल्यास त्याच्याही आधी प्रगत भारत उभा करणे हे हस्तिदंती मनो-यात बसून विचारलेले मिथ्या स्वप्न नव्हे किंवा केवळ आशावादही नव्हे. खरे तर, ही अथक परिश्रमांची मागणी करणारी आणि अव्याहत चालणारी मोहीम आहे. आपण सारे त्यात मनापासून सहभागी होण्याचा अवकाश... मोहीम यशस्वी झालीच म्हणून समजा !