Description
संगीतात जे नातं सूर आणि तालाचा,
तेच नातं शास्त्रीय प्रगतीत
गणिताचं आणि विज्ञानाचं.
सुरवाद्य आणि तालवाद्य यांच्या परस्पर मेळातून
जसं मनाला मोहून टाकणारं
कर्णमधुर संगीत जन्म घेतं,
तशा गणित आणि विज्ञानाच्या परस्परपूरक
कामगिरीतून ज्ञानकक्षा रुंदावत जातात.
विज्ञान विश्वातील कोड्यांचा शोध घेत राहतं,
तर गणित त्यामागचे सिद्धांत आणि तत्व स्पष्ट करत जातं.
मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून ही
गणित आणि विज्ञानाची
जादुई जुगलबंदी चालत आलेली आहे.