Description
बाबूराव जगताप हे पुण्याच्या शैक्षणिक व नागरी जीवनामधले एकेकाळचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांची ही जीवनगाथा. \'गुरुवर्य\' जगताप यांनी श्री शिवाजी मराठा स्कूलची केलेली स्थापना आणि ती संस्था नावारूपाला आणण्यासाठी केलेले विविध प्रयत्न... कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी म्हणून किंवा गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाचे संचालक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी... \'शिक्षक\' मासिकाचे प्रदीर्घकाळ संपादन करण्यामागचा किंवा टॉलस्टॉयच्या निवडक कथा अनुवादित करून प्रकाशित करण्यामागचा त्यांचा ध्येयवाद... पुण्याच्या नागरी जीवनात पक्षनिरपेक्ष भूमिकेतून जबाबदारीची कामे पार पाडताना त्यांनी सहज साधेपणाने उमटवलेला आपला ठसा आणि त्यामुळे गाजलेली त्यांची महापौरपदाची कारकीर्द... ही सारी तपशीलवार चरित्रकथा वाचली की, \'समाजावर सात्त्विक संस्कार करतो, तो खरा गुरू\', या अर्थाने बाबूराव जगताप यांना \'गुरुवर्य\' ही उपाधी कशी चपखल शोभते, हे सहज स्पष्ट होते. गुरुवर्यांच्या मुलानेच जिव्हाळयाने सांगितलेली ही चरित्रकथा. शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात काम करणा-या सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, प्रेरणा देईल, अशी...