Description
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता! भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ. बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख.