Description
जैववैविध्य आणि अभयारण्ये तुम्ही कधी एखाद्या जंगलाला भेट दिली आहे का? आपला मोगली, सिंबा आपल्याला आवडतो ना? मग प्रत्यक्षातले बगिरा, सिंबा, भालू यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही. आपणही त्यासाठी काही करू शकतो. त्यासाठी जैववैविध्य म्हणजे काय, ती नष्ट होण्याची कारणे काय, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांची आवश्यकता काय, हे माहिती करून घ्यायला हवे. चला, त्यासाठी हे पुस्तक वाचू या.