Description
जेरुसलेम ... ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान या तिन्ही समाजांना अत्यंत श्रद्धेय असणारं हे शहर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं सतत धुमसत राहिलं आहे. इस्त्राइलच्या स्थापनेपासून गडद होत गेलेला ज्यू-अरब संघर्ष आता अत्यंत स्फोटक अवस्थेत पोचला आहे. त्या संघर्षाच्या गेल्या वर्षीच्या अत्यंत निर्वाणीच्या टप्प्यावर निळू दामले हे प्रसिद्ध पत्रकार त्या युद्धभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन, तेथली स्थिती निरखून आले. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्या संघर्षाचा अथपासून इतिपर्यंतचा इतिहास नाही, पण सर्वसामान्यांना तो जटिल प्रश्न समजू शकेल अशा रीतीने केलेले माहितीपूर्ण, रोचक-रंजक वृत्तांतकथन आहे. विषयाला थेट जाऊन भिडणार्या, व्यक्ती-प्रसंगांच्या नेमक्या निरीक्षणातून किस्से सांगत, गुंते उलगडवत नेणार्या विशेष शैलीत केलेले युद्धभूमीचे हे आगळेवेगळे प्रवासवर्णन आहे.