Description
वडलांचा आदेश शिरसावंद्य मानून, आयुष्यभर निष्काम कर्मयोग आचरीत आलेल्या जयंतराव पाटलांची ही जीवनकहाणी आहे. कृषिक्षेत्रातले आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव उपयोगात आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश आणणा-या एका प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही गाथा आहे. ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही अनुकरणीय अशी कथा आहे. जयंतराव पाटलांसारखीच साधी, सरळ आणि तरीही समाधानाची समृध्दी मिळवून देणारी...