Description
'‘मनू’ हे नाव आहे पेरू देशाच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या अन् नंतर महाकाय अॅमेझॉनला मिळणाऱ्या एका नदीचे. अमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने सर्वांत समृध्द अशी जागा. पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया असो, हजारो प्रकारच्या वेगवेगळया वनस्पतींचे बहरलेले विश्व असो, जलचर अन् उभयचर प्राण्यांपासून कीटक अन् सस्तन प्राण्यांपर्यंतच्या हजारो प्रजाती असोत, या साऱ्या विविधांगी, विविधरंगी जीवसृष्टीला अंतरंगात सामावून घेणारे मनूचे अरण्य. पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेल्या या सदाहरित घनदाट जंगलात एका झपाटलेल्या निसर्गप्रेमीने मनसोक्त भटकंती केली. त्या भटकंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन् छायाचित्रांमधून पानांवर उमटलेले ‘मनू’चे अरण्य '