Description
पाणी ही जगण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे; मात्र या नैसर्गिक संपत्तीचा पृथ्वीवरचा साठा मर्यादित आहे. पाणी आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारे गरजेचे आहे, इतर सजीवांना त्याची काय मदत होते आणि ते काटकसरीने वापरले नाही, ते स्वच्छ ठेवले नाही, तर काय होईल? चला, जाणून घेऊ या पाण्याविषयी सगळे काही!