Description
'राजीव गांधी आणि सोनिया गांधी. अचानक उद्भवलेल्या दु:खद परिस्थितीच्या दबावामुळे वेगवेगळया वेळी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी ढकलल्या गेलेल्या या पतिपत्नींची कथा आहे ही. एका उच्च, कर्तबगार सनदी अधिकाऱ्याने सांगितलेली... राजीव आणि सोनिया या दोघांच्याही आतल्या वर्तुळात वावरायची संधी मिळालेल्या राम प्रधान यांनी सांगितलेल्या या आठवणी... राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक प्रसंगांमागच्या गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींची तपशीलवार नोंद घेणारे हे आत्मकथन राजीव-सोनियांबद्दलही बरेच काही सांगून जाते. '