Description
वर्तमानपत्रातील एका साध्या बातमीतले मंत्र्यांचे आवाहन हेच आव्हान समजून एका हाडाच्या उद्योजकाने दूध पिशवीत भरण्याचे यंत्र तयार केले आणि बघता बघता बाजारपेठेचे रूप पालटवण्याची किमया करून दाखवली.
लोखंडी खिडक्या, जाळ्या बनवण्यापासून सुरू झालेला साधा व्यवसाय रमेश जोशी नावाच्या एका कल्पक, जिद्दी उद्योजकाने नावारूपाला आणला.
पॅकेजिंगचे नवे तंत्र त्यांनी भारतात सर्वदूर पोहोचवलेच, पण ‘नायक्रोम’ हा ब्रँड जागतिक पातळीवर सुप्रतिष्ठित केला.
रमेश जोशी यांच्या कर्तृत्वाची, त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाची, त्यांच्या वाटेतल्या खाचखळग्यांची आणि त्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाची कहाणी ‘माझी कॉर्पोरेट यात्रा’ या नावाने प्रसिद्ध केली.
आपल्या रिकाम्या वेळात फ्रेडरिक फोरसिथचे ‘डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह’ हे पुस्तकही रमेश जोशींनी अनुवादित केले. ही दोनही पुस्तके तरुणांना प्रेरणा देतील, हे नक्की.