Description
'चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार '