Description
'स्तानिस्लावस्की! जगभरच्या रंगकर्मींसाठी एक अत्यंत आदरणीय नाव. अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय, अशी त्याची धारणा़. या जीवितकार्याची पूर्वतयारी आत्मशुध्दीपासून होते, अशी त्याची श्रध्दा़. रंगमंचावरचा सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी त्याने केलेले मार्गदर्शन म्हणजे `रंगमंचकला. स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका आता मराठीत सादर.