Description
'रवींद्र पिंगे म्हणजे आपल्या लेखनातल्या जिव्हाळयाने, मित्रत्वाच्या उमाळयाने पहिल्या भेटीत वाचकाला आपलेसे करणारा साहित्यिक. पण याच्यापलीकडेही या माणसाचे अनेक पैलू होते. चवीने खाणारा खवय्या, डोळसपणे न्याहाळणारा भटक्या, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेणारा रसिक अन् कधीही हाक मारली तर ओ देणारा मित्र. या सा-या पैलूंनी भरलेले अन् भारलेले रवींद्रायन