Description
'आनंद मासिकाचे संपादक, आकाशवाणीवरील बालोद्यान कार्यक्रमातील नाना, ख्यातनाम बालसाहित्यिक अशा अनेकविध नात्यांनी मुलांमध्ये रमलेल्या गोपीनाथ तळवलकरांच्या आठवणी म्हणजे सहस्रधारा. या आत्मचरित्रात आत्मगौरव, आत्मसमर्थन, अहंकार यांचा स्पर्शही नाही. लेखकाच्या ॠजू व्यक्तिमत्त्वासारख्याच सौम्य, शीतल प्रवाहाने नटलेल्या आहेत या सहस्रधारा. '