Description
सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश. शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा... पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा... त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा... त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती ली क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची. त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा... भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी...