Description
हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही.
जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून,
तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे.
सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच.
पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची;
आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो,
याचे भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा !
अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे
चार्ल्स व्हीलन यांचे ‘नेकेड इकॉनॉमिक्स’
हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत.