Description
विसाव्या शतकातल्या \'विकासा\'नं आपली भौतिक स्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही. पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेक गुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपण सोडली नाही, तर ह्या समस्या आपला सर्वनाश घडवून आणतील. म्हणून आता एकविसाव्या शतकात आवश्यकता आहे ती विकासाच्या वेगळया वाटा चालण्याची. महात्मा गांधी, शूमाखर, दीनदयाल उपाध्याय, फ्रिटयॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्या पाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्या अशा वेगळया विकास-वाटांचा हा मागोवा.