Description
ही काही कपोलकल्पित कथा नाही, काल्पनिक कहाणी नाही. ही आहे एक खरीखुरी गोष्ट. एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सर अन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढा यांची अगदी कालपरवा घडलेली वास्तव गोष्ट. पारदर्शक साधेपणा, नितळ निवेदन अन् जीवनाबद्दलचा सकारात्मक विचार अशा तिहेरी पेडांनी विणलेला गोफ चितारणारे आत्मकथन