Description
सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक संदर्भांत महत्त्वाचे आहे. सुधा मूर्तींचा प्रवास श्रीमंत आणि समृद्ध आहे. असे अनुभवविेश फार कमी लोकांच्या वाट्याला येते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका छोट्या गावातल्या मुलीने आपल्या स्वयंप्रज्ञ इच्छाशक्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी, ही गोष्ट विलक्षण अशीच आहे. ज्यांना माणूस समजून घेण्यात रस आहे, त्यांना तर ही गोष्ट फारच आवडेल. इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासूबाई असणार्या सुधा मूर्ती आता आपल्या राज्यसभेत खासदार म्हणूनही दिसणार आहेत. एक मोठा उद्योगसमूह उभा करणे, चालवणे; सामाजिक कामांसाठी पुढाकार घेणे, विविधांगी आणि वाचकप्रिय लेखन करणे अशा अनेक रूपांतून आपल्याला भेटणार्या सुधा मूर्तींचा हा अवघा जीवनपट वाचताना आपणही थक्क होतो. डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी त्यासाठी पुष्कळ परिश्रम केले असतीलच; पण तितक्याच सहज आणि सळसळत्या शैलीत हा पट त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. सुधा मूर्ती यांच्या चाहत्यांना तर हा पट आवडेलच; पण त्यांच्याविषयी आक्षेप असणार्यांनाही हा जीवनप्रवास समजून घेणे महत्त्वाचे वाटेल!