Description
'आपली मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, यशस्वी व्हावीत... असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण हे साधायचं कसं, हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे. जग झपाटयानं बदलतं आहे, जीवनशैली बदलते आहे. टीव्ही, कॉम्प्यूटर, इंटरनेट, मोबाईल... अशा माध्यमांच्या प्रभावात आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात वाढणा-या आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे? आजची मुलं ऐकतच नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची? त्याहीपुढे जाऊन पोटच्या पोरांना प्रेम देण्याइतकी फुरसतही आज पालकांकडे नसेल, तर...? पालक असणं वेगळं आणि पालक होणं वेगळं! पालक होणं हे एक घडणं असतं. आजच्या काळात पालक होणं म्हणजेच सुजाण पालक होणं. दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं पालकत्व पेलत असतानाच, पालक असण्यातला आनंदही अनुभवता येणं म्हणजे सुजाण पालक होणं! सुजाण पालकत्वाचा हा मंत्र सुलभ शैलीत उलगडून सांगणारं हे मराठीतलं अद्ययावत असं गाईड पालकांच्या संग्रही असायलाच हवं. – पूर्वीच झालेल्या किंवा होऊ घातलेल्या... सर्वांच्याच!