Description
श्रद्धा-अंधश्रद्धा शोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशी संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माची कृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ आजतरी भारतात अन्यत्र आढळत नाही. समाजाला पुढे नेण्यासाठी, डोळस, निर्भय बनवण्यासाठी, विचारांचे परिवर्तन हे या कार्याचे सूत्र आहे आणि हत्यार आहे प्रबोधनाचे. तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची , आर्जवी आवाहनाची, कळकळीची पण निर्धाराची भाषा वापरत गेली दहा वर्षे अखंडपणे यासाठीचा विवेकजागर आपल्या भाषणांतून नरेन्द्र दाभोलकर सर्वदूर पोचवीत आहेत. चळवळीला वाढता प्रतिसाद मिळवत आहेत. लोकांना मंत्रमुग्ध करणारे त्या भाषणाच्या शैलीतले हे लिखाण वाचकाला भिडल्याशिवाय, अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही.