Description
समलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत, वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून प्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव. तिला समाजमान्यता नसल्याने, तिची सतत `विचित्र म्हणून हेटाळणी होत असल्याने ती अनुभवताना अनेक विचारचक्रे माझ्या डोक्यात कायम चालू असायची, अजूनही असतात. माझे हे अनुभव आणि त्यावरचे विचारमंथन कधी मला खूप समृध्द करून गेले, तर कधी पराकोटीचे अस्वस्थ! `समाजमान्यता हा शिक्का बरेचदा निष्ठूर, दुराग्रही आणि अज्ञानमूलक असतो हे अनुभवून झाले़. `मी समलैंगिक आहे हे सांगण्याचा निर्णय अंमलात आणायला पंचवीस वर्षे लागली आणि त्यातून साकार झाले `आपुले आपण