{"product_id":"आनंददायी-बगळे-संस्कृत-साहित्यातील-काही-पक्षी-by-मारुती-चितमपल्ली","title":"आनंददायी बगळे संस्कृत साहित्यातील काही पक्षी by मारुती चितमपल्ली","description":"\u003cdiv class=\"BookDetails_Summary\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eप्रसिद्ध निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांच्या ओघवत्या आणि रसाळ भाषेतून उतरलेले हे 'आनंददायी बगळे' सुंदर अनुभव देतात. बगळ्यांच्या विणीच्या हंगामात म्हणजे पावसाळ्यात श्यामल वर्णाचे बगळे आकाशात उडताना पाहणं हे विहंगम दृश्य असतं. या संदर्भात चितमपल्ली लिहितात, 'बगळ्यांच्या समूहाचं अंतरीक्षात चाललेलं अनुनयाचं दृश्य तर स्वर्गीय असतं. असं वाटतं, की प्रभामंडळ असलेल्या धुक्याचा विशाल पुंजकाच अंतराळात तरंगत आहे.' संस्कृत साहित्यात वर्णिलेले हे विविध पक्षी पुस्तकातून आपल्या भेटीला येतात. पाकहंस, वर्तीर, उपचक्र, चकोर, कृष्णतित्तिर, चित्रवार्तिका, लावा पक्षी, खारकोण, माळढोक, चातक, चास, कानारी आशा विविध पक्षांची सचित्र माहिती या पुस्तकातून मिळते. या शिवाय कालिदासाचं पक्षिविश्व समजून घेण्याची संधीही चितमपल्ली यांनी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":67706455916788,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/f01774af3f764988a6149c44c735f5c7.jpg?v=1791282154","url":"https:\/\/vaikharibook.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-by-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}