Description
आशिया खंडातील वैदिक संस्कृतीच्या विस्ताराचा इतिहास. * कंबोडियापासून श्रीलंकेपर्यंत आणि सिंगापूरपासून फिलिपाइन्सपर्यंतच्या प्रदेशात किमान दोन हजार वर्षं वैदिक हिंदू राजांच्या राजवटी होत्या, हे भारतीय इतिहासातून शिकवलं जात नाही. उझबेकस्तानापासून चीनपर्यंत आणि इंडोनेशियापासून कोरिया-जपानपर्यंत भारतीय संस्कृतीचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव सर्वत्र पसरला होता, हेही आपल्या पाठ्यपुस्तकांमधून फारसं सांगितलं जात नाही. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या प्रभावाखालील भारतीय राज्यकर्त्यांनी दीर्घकाळ दडवलेला हा गौरवशाली इतिहास या पुस्तकामधून साधार आणि तपशीलवार मांडायचा प्रयत्न केला आहे. बृहद्भारताच्या या महान राजकीय व सांस्कृतिक प्रगतीचा आलेख दाखवणारा हा ग्रंथ प्रत्येक भारतीयाच्या संग्रही असायला हवाच.