Description
१० ऑगस्ट २०१७... गोरखपूरच्या सरकारी इस्पितळातला द्रवरूप ऑसिजन संपला... पुढच्या दोन दिवसांत ६३ मुलं आणि १८ प्रौढ यांचा मृत्यू झाला...
ऑसिजन मिळवण्यासाठी डॉ. कफील खान यांनी एकहाती संघर्ष केला...
ऑसिजन व्यवहारातली भ्रष्टाचाराची साखळी उघडी पडली...
लोकांच्या लेखी कफील हिरो ठरले... आणि सत्तेच्या लेखी शत्रू...
कफील यांनाच चोर ठरवलं गेलं... तुरुंगात टाकण्यात आलं... कुटुंबाची ससेहोलपट झाली...
पण कफील हरले नाहीत. ते लढत राहिले. आजही लढताहेत...
एक उन्मत्त सत्ता आणि कर्तव्यनिष्ठ डॉटर यांच्या झुंजीची ही कहाणी. हृदय पिळवटून टाकणारी. तितकीच लढणार्यांना बळ देणारी...

